गोबापुर गावाची माहिती
कळवण तालुक्यात गोबापुर हे खेडे गाव आहे.गोबापुर हे नाव पुर्वीच्या काळात या गावात गोबरगॅस होती म्हणुन या गावाला गोबापुर हे नावं देण्यात आले. गोबापुर या गावातील लोकांच्या मुख्य व्यवसाय शेती आहे. या गावातील लोकांच्या मुख्यता: शेतीवर प्रमाणात भर दिला जातो. तसेच गोबापुर गावातील सुधारणा साधारपणे परिस्थिती चांगली आहे.या गावात मराठी शाळा आहे.व अंगणवाडी आहे.
म्हणुन गोबापुर या गावात ग्रुप ग्रामपंचायत आहे.तसेच या गावात ग्रामपंचायत मध्ये या गावच समावेश झालेला आहे. मार्कंडपिंप्री,पाळेपिंप्री हे गाव आहेत.
मार्कंडपिंप्री:-
गोबापुर पासून ३ कि.मि.अंतरावर मार्कंडपिंप्री हे गाव आहे. मार्कंडपिंप्री हे ग्रामीण भाग आहे. या गावाच्या शेजारी एक मोठे डोंगर आहे. त्या डोंगरावर बारा ऋषीपैकी मार्कंडऋषी हे देवस्थान आहे. व त्या गावाच्या शेजारी अतिप्राचीन शिव मंदिर आहे.या दोन देवस्थानावर या गावाला मार्कंडपिंप्री हे नावं देण्यात आले. या गावाची लोकसंख्या साधारपणे ६५७ इतकी आहे. महाशिवरात्रीला या गावात महादेवाची यात्रा भरते. या दिवशी हजारो भ्विक शिवलिंगाचे दर्शन घेतात. तसेच या मंदिरालगत धरण आहे. या धरणापासून एक छोटी बेहडी नावाची नदी वाहते. येथील लोकांची मुख्य व्यवसाय शेती आहे. पावसाळ्यात मुख्यता: भात, नागली, बाजरी, भुईमूग, सोयाबीन ईत्यादी पिके घेतली जातात.
येथील हवामान शेतीला अनुकूल आहे. त्यामुळे हे पिके घेतली जातात.
पाळेपिंप्री:-
ग्रुप ग्रामपंचायत गोबापुर या गावापासून साधारण २.५० कि.मि. अंतराव डोंगरड-यात पाळेपिंप्री हे छोटेसे खेडे गाव वसलेले आहे. या गावात पूर्वीच्या काळी पिंपळाचे लहान मोठे झाडे खुप होते.त्यामुळे या गावाला पाळेपिंप्री हे नावं देण्यात आले.या गावाची लोकसंख्या साधारण ७४९ ईतकी आहे. हे गाव ग्रामीण भाग आहे. या गावाची सुधारणा ब-यापैकी चांगली आहे. या गावात ई १ली ते ७ वी पर्यंत जिल्हा परिषद मराठी शाळा आहे. तसेच अंगणवाडी आहे.
या गावात मुख्यता: करून शेतकरी वर्ग आहे. त्यामुळे येथील व्यवसाय शेती हा मानला जातो.पावसाळ्यात मुख्यत: भात, नागली, बाजरी, भुईमूग, सोयाबीन,कांदा,टोमॅटो ईत्यादी पिके घेतली जातात.
या गावाच्या जवळ पश्चिमेस सप्तश्रृंगी माताचे गड डोंगर आहे. त्या डोंगरावर साडेतीन शक्ती विद्यापिठापैकी आर्धा शक्तीविद्या पिठ म्हणजे सप्तश्रृंगी माताचे स्थान आहे. तसेच तेथे सिदकडा बगण्यासाठी भाविकांची मोठ्याप्रमाणात गर्दी असते. या सप्तश्रृंगी मातेची यात्रा नवरात्र व चैत्र पोर्णिमेला यात्रा भरते.
तसेच येथील हवामान थंड आहे. तसेच या गडाच्या पायथ्याची नांदुरी हे बसस्थानक आहे.
ग्रामपंचायतीची स्थापना ०६ जुन १९६५
गावाजवळचे बसस्थानक :- कळवण, नांदुरी
प्रमुख तीर्थस्थळे :- सप्तश्रृंगी गड, मार्कडेय डोंगर,भुनेश्वर मंदिर
पर्यटन स्थळे :- सापुतारा
तालुकापासुंचे गावाचे अंतर :-३० कि.मि.
जिल्हास्तरापासून गावाचे अंतर :- ७० कि.मि.